बळीराजाने सरकारला एक दमडीचीही अोवाळणी देऊ नये : राज ठाकरेंचे आणखी एक व्यंगचित्र

मुंबई | पोलीसनामा आॅनलाइन – शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देत हे सरकार सत्तेत आले आहे, मात्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या सरकारच्या काळात शतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी हे सरकार पाडव्याच्या दिवशी तुम्हाला ओवाळेल तुमच्याकडे मतांची ओवाळणी मागेल मात्र त्यांना एक दमडीही देऊ नका असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या व्यंगचित्रातून सुचवायचे आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 

शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू अशा प्रकारची अनेक आश्वासने देऊन सरकार सत्तेत आले होते. मात्र त्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिले नाही. नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी तुम्हाला ओवाळून मतांची ओवाळणी मागायला येतील तेव्हा त्यांना एका दमडीही देऊ नका. अशा सुचनेचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबूक तसेच ट्विटर वर पोस्ट केले आहे.

धनत्रयोदशीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर वर त्यांचे व्यंगचित्र पोस्ट करत आहेत. यामध्ये त्यांनी अमित शाह, नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांवर व्यंगचित्र काढून झाल्यावर आता महाराष्ट्र सरकारवर म्हणजेच भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. बलिप्रतीपदेच्या, दिवाळी पाडव्याच्या दिवशी पोस्ट केलेले हे व्यंगचित्र सत्ताधाऱ्यांना चांगलेच झोंबण्याची शक्यता आहे.