राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी ‘या’ दोन अभिनेत्यांच्या नावाची चर्चा 

मुंबई :वृत्तसंस्था – अनेक दिवसापासून बॉलिवूडमध्ये अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकची चर्चा सुरु आहे. या सिनेमात पहिल्यांदा आमिर खानच्या नावाची चर्चा होती. पण आमिरने काढता पाय घेतल्यानंतर या चित्रपटासाठी शारुखच्या नावाची चर्चा सुरु झाली. पण शाहरुखने सुद्धा ‘डॉन ३’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी या चित्रपटाला नकार दिला. आता या दोघांनीही चित्रपटासाठी नकार दिल्यानंतर दोन नवोदित कलाकारांच्या नावाची चर्चा होत आहे.

एका वृत्तानुसार या चित्रपटातून शाहरुखने एक्झिट घेतल्यानंतर सिद्धार्थ आणि रॉनी स्क्रूवाला यांनी या भूमिकेसाठी नवा चेहरा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेसाठी विकी कौशल आणि कार्तिक आर्यनपैंकी एकाच नाव फायनल होऊ शकते. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे दिग्दर्शक महेश मथाई यांनी कार्तिक आर्यनची भेट घेतली होती. तसेच काही दिवसांपूर्वी विकी कौशलदेखील सिद्धार्थच्या ऑफिसबाहेर दिसला होता. आता या चित्रपटात कोणाची वर्णी लागते हे आपल्याला लवकरच कळेल.

अंतराळवीर राकेश शर्मा यांनी २ एप्रिल १९८४ साली सोयुझ टी-११ या यानातून अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून मान मिळविला होता. ३५ व्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असणारे राकेश शर्मा हे भारतीय वायूदलात टेस्ट पायलट म्हणून १९७० साली सहभागी झाले होते.