”राखी स्वतःच घेईल बदला” …गीता आणि बबिता फोगट 

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन – पंचकूलाच्या कॉंटिनेंटल रेसलिंग एंटरटेंमेंट (सीडब्ल्यूई)फाइटमध्ये राखी सावंतने विदेशी रेसलरचा इतका मार खाल्ला कि ती डायरेक्ट बेड रेस्टवरच गेली. यावर एका वृत्तसंस्थेने गीता आणि बबीताला याचा बदला घेणारका अशी विचारणा केली असता दोघींनीही राखी तिचा बदला स्वतःच घेईल असा सांगून सावध पवित्रा घेतल्याचं दिसून आलय. तसाच त्या म्हणाल्या कि सीडब्ल्यूई रिंगमध्ये खेळणारा कोणताही खेळाडू कुस्ती खेळणाऱ्यांसमोर टिकू शकत नाही अशा प्रकारच्या फाईटसाठी जास्त ताकतीची गरज नसते त्यामुळे राखी जिंकू शकते. असं म्हणून त्यांनी राखीला दिलासा दिल्याचंही समजतय. आता राखी बरी  झाल्यावर गीता बाबीतला याविषयी काय सुनावतीये हे पाहणं देखील गमतीशीर असणार आहे.

राखीने खाललेल्या  या माराची चर्चा सध्या देशभरात चांगलीच रंगतीये. नुकतीच भारताचा खलीबली म्हणजेच पहिलवान खलीने राखीची भेट घेतली. राखी आता या रेसलरचा बदला कसा घेणार हे पण पाहण्यासारखं असणार आहे. पंचकूलाच्या कॉंटिनेंटल रेसलिंग एंटरटेंमेंट (सीडब्ल्यूई) फाइटमध्ये प्रमोशनसाठी राखी अली होती. त्यावेळी या विदेशी रेसलरने खुलं आव्हान दिलं.

‘जर कोणत्या भारतीय महिला रेसलरमध्ये दम असेल तर माझ्याशी फाइट करावी’, असं ती म्हणाली. तेव्हा राखीला  राग अनावर झाला. आणि ती डान्स करत रिंगमध्ये पोहोचली आणि त्या रेसलरला चॅलेंज केलं की ‘माझ्या सारखा डान्स करून दाखवं असं म्हणत तिला चिडवू लागली. ‘यावर चिडलेल्या रेसलरने राखीला आपटून आपटून मारलं. आणि राखीला दुखापत झाली. राखीने या गोष्टीचा राग चांगलाच मनात धरून ठेवल्याचं कळतंय. आणि या प्रकरणावर कोण काय प्रतिक्रिया देतायेत यावरही राखीचं बारीक लक्ष असल्याचं कळतंय. आता बरी झाल्यावर राखी कोणाकोणाचा बदला  घेणार हे बघण्यासारखं असणार आहे.

नुकतेच तनुश्री दत्त्ता आणि राखी सावंत यांच्या वादाचं प्रकरण चव्हाट्यावर असताना हा प्रकार झाला. राखीने तनुश्रीवर असा आरोप देखील केलाय कि तनुश्रीनेच त्या विदेशी महिला रेसलरला मला मारण्यासाठी पैसे दिले आहेत.