दिपक कलालच्या धुलाईवर ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणाली…   

मुंबई : वृत्तसंस्था – ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंतचा मित्र दीपक कलाल याला भर रस्‍त्‍यात मारहाण झाल्याचा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये काही लोक दीपक कलालला भर रस्‍त्‍यात मारहाण करताना दिसत आहेत. दीपक कलालला मारहाण झाल्‍यानंतर आता राखी सावंतनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दीपकला अशी मारहाण झाल्‍यानंतर राखी सावंत भडकली असून तिने आपला संताप व्यक्त केला आहे.

याघटनेवर राखी सावंत म्हणाली ‘मी मान्‍य करते की, दीपक कलाल चुकीचे वागला. परंतु, अशा प्रकारे त्याला मारहाण नाही करायला पाहिजे. दीपकचे बोलणे चुकीचे वाटले असेल तर याची तक्रार पोलिस स्टेशनमध्‍ये जाऊन करायला हवी.’ तसेच हार्दिक पांड्यावर निशाना साधत राखी म्हणाली, ‘हार्दिक पांड्याच्‍या वक्‍तव्‍यानंतर आता मीटू वाले कुठे गेले. देशात लहान-लहान मुलींवर रेप होतो, त्‍यावेळी हे लोक कुठे जातात.’

दीपक कलालला झालेल्‍या मारहाणीमुळे सध्या राखी सावंतची यू-ट्यूबवर सध्‍या चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी पत्रकार परिषद घेऊन लग्‍नाची घोषणा केली होती. नंतर राखीने या लग्‍नासाठी नकार दिला होता.

दीपक कलालने दिल्ली के ‘कनॉट प्लेस’मध्‍ये आक्षेपार्ह व्‍हिडिओ टाकला होता. हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर काही नाराज लोकांनी दीपक कलाल भर रस्‍त्‍यावर मारहाण केली होती. या प्रकारानंतर काही लोकांनी याला एक पब्लिसिटी स्टंटदेखील म्‍हटले आहे.