महिला कुस्तीपटूकडून राखी सावंतला धोबीपछाड, राखी रिंगमधून थेट रुग्णालयात

पंचकुला (हरियाणा) : वृत्तसंस्था – अभिनेत्री राखी सावंत काही उलट सुलट गोष्टी करत किंवा नेहमी काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत कायम चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी ती दररोज काही ना काही ड्रामा करतच असते. नुकतेच एका कुस्तीपटूचं चॅलेंज स्वीकारणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. विदेशी महिला कुस्तीपटूने राखीला धोबीपछाड केलं आहे. रेसलिंग रिंगमधून थेट रुग्णालयात जाण्याची वेळ राखीवर ओढावली आहे. पंचकुलातील ताऊदेवी लाल स्टेडियममध्ये ग्रेट खली आयोजित रेसलिंग शोमध्ये राखीला दुखापत झाल्याचं कळतं आहे.

हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजित केलेल्या स्पर्धेत विदेशी कुस्तीपटू रोबेलने फाईट जिंकल्यानंतर ‘कुण्या भारतीय महिलेत हिंमत असेल तर तिने माझ्याशी लढावे’, असं ओपन चॅलेंज दिले. तिचं हे चॅलेंज ऐकताच राखीने तिला प्रतिआव्हान देत ‘तुझ्यात दम असेल तर तू माझ्यासारखं नाचून दाखव’ असं सांगितलं. त्यानंतर राखीने डान्स करण्यास सुरुवात केली. मात्र तिचा डान्स पाहत असताना अनेकांनी राखीला चीअरअप करत रोबेलला ठेंगा दाखवत चिडवले. हा राग मनात धरत रोबेलने राखीला हवेत उचलून जोरात जमीनीवर आपटलं. 5 ते 8 मिनिटं राखी सावंत रिंगमध्ये वेदनेने कळवळत होती. सुरुवातीला प्रेक्षकांना आणि सीडब्लूई चॅम्पियशनपच्या कर्मचाऱ्यांना काही समजलंच नाही. राखीला दुखापत झाल्याचं समजल्यानंतर तिला जीरकपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून रोबेलला अचानक राग अनावर झाला आणि तिने राखीला उचलून खाली आपटले. मात्र आता राखीची प्रकृती ठीक असल्याचं’, आयोजक समितीचे सदस्य बलवान यांनी सांगितले.

या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. सीडब्लूई चॅम्पियनशिप पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. द ग्रेट खलीसह अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू उपस्थित होते. सीडब्लूई चॅम्पियनशिप पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. द ग्रेट खलीसह अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू उपस्थित होते.

https://twitter.com/HatindersinghR/status/1061867486352527360