‘त्या’ हत्याकांड प्रकरणी ‘राम रहीम’ला आज शिक्षा

दिल्ली : वृत्तसंस्था –  पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हत्‍या सोळा वर्षापूर्वी करण्यात आली होती. ‘डेरा सच्चा सौदा’ चा प्रमुख गुरमीत राम रहीम या हत्‍याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी होता. २००२ मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. पत्रकार छत्रपती यांनी आपल्या वृत्तपत्रात डेराबाबत अनेक गोष्टींच्या बातम्‍या छापल्या होत्या. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. आज पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणातील दोषी ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमीत राम रहीम याला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाचा हा निर्णय व्‍हिडिओ कॉन्‍फ्रेसिंगद्वारे दिला जाणार आहे. पत्रकार हत्याकांड प्रकरणी गुरमीत राम रहीम याच्याबरोबर अन्‍य तीन जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले होते.

लोकपाल, लोकायुक्ताच्या नियुक्तीवर अण्णा ठाम

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या सोळा वर्षापूर्वी घडलेल्या हत्याकांड प्रकरणी मागील बुधवारी सर्व आरोपींवरील आरोप सिद्ध झाले होते. गुरमीत राम रहीम याच्याबरोबर कृष्ण लाल, निर्मल सिंह आणि कुलदीप सिंह या तिघांना आता न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची गरज नसल्याचे न्‍यायालयाकडून सांगण्यात आले आहे. साध्वीच्या लैंगिक शोषण प्रकरणी रोहतकच्या तुरुंगात गुरमीत राम रहीम शिक्षा भोगत आहे. तर अन्य तीन आरोपी अंबालातील मध्यवर्ती कारागृहात आहेत.
पत्रकार हत्‍याकांड प्रकरणातील चार दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार असल्याने व सुरक्षेच्या कारणास्‍तव व्‍हिडिओ कॉन्‍फ्रेंसिंगद्वारे ही शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने हरियाणा सरकारकडून व्‍हिडिओ कॉन्‍फ्रेंसिंगद्वारे ही सुनावण्यात करण्यात यावी, अशी याचिका दाखल केली होती. यानंतर सुरक्षेचा विचार करून ही याचिका न्यायालयाकडून मान्य करण्यात आली होती. २५ ऑगस्‍ट २०१७ मध्ये साध्वीच्या लैंगिक शोषण प्रकरणी गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर पंचकुलामध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती.