राजकीय

‘त्या’ निलंबित आमदाराला दिवसा ढवळ्या खासदारकीचे स्वप्न !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या रक्कमेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबीत आमदार रमेश कदम यांना सोलापूर लोकसभा निवडणूक शिवसेने कडून लढायची आहे. या बाबत रमेश कदम यांनी चाचपणी सुद्धा केली आहे. या वृत्ताला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सोमवारी स्वतः दुजोरा दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यासहित राज्यभरात विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या रक्कमेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपा वरून मोहोळ विधानसभेचे आमदार रमेश कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. रमेश कदम यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात २०१५ साली अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात रमेश कदम यांना अटक झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने निलंबित केले होते. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उसल्याने रमेश कदम हे पुन्हा चर्चेत आले आहेत.

आमदार रमेश कदम यांनी स्वतःहून शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली असून शिवसेना प्रवेशाच्या दृष्टीने कदम यांच्या सोबत दोन बैठका झाल्या आहेत असे गणेश वानकर यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीला भाजप सोबत शिवसेनेची युती झाली नाही तर त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून संधी दिली जाऊ शकते. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे अनेक नेते राजकारणात आहेत म्हणून आम्ही रमेश कदमांना शिवसेनेत घेणार आहोत असे गणेश वानकर म्हणाले आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या