मनोरंजन

जून महिन्यात आलिया-रणबीर करणार साखरपुडा ?

मुंबई : वृत्तसंस्था – अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेले जोडपे आलिया आणि रणबीर कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याचे समजले आहे. हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणार, असे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे.
एका प्रसिद्ध मासिकाने याबद्दलचे वृत्त दिले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दोघेही साखरपुडा करणार, असे मानले जात आहे.  खुद्द रणबीरची आई नीतू कपूर यांच्यासह अख्ख्या कपूर कुटुंबीयांची आणि भट कुटुंबाची तशी इच्छा आहे. ‘ब्रह्मास्त्र’ येत्या ऑगस्ट मध्ये प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी या दोघांनी साखरपुडा करावा अशी कुटुंबाची इच्छा आहे आणि म्हणूनच कुटुंबाच्या इच्छेखातर रणबीर आणि आलिया येत्या जूनमध्ये एन्गेज्ड होतील, असे कळतेय.

आलिया व रणबीरचे नाते कपूर कुटुंबाने मान्य केले आहे. हेच कारण आहे की, आलिया अनेकदा कपूर कुटुंबासोबत दिसली आहे. अगदी अलीकडे आलियाने कपूर कुटुंबासोबत न्यू ईअर साजरे केले. याआधीही अनेकदा आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत दिसली आहे.

नुकतेच महेश भट यांनी रणबीर व आलिया रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले होते. एका मुलाखतीत महेश भट, आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले होते.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या