आमच्या तयारीचा मित्रपक्षांना फायदाच होईल !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे लोकसभेच्या मतदारसंघांचा आढावा घेण्याचे काम सुरु आहेयुती झाल्यास मित्रपक्षांसाठी जागा सोडणार आहोत, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं. त्यासोबतच आमच्या तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं. ते साताऱ्यात बोलत होते.

भाजपच्या तयारीचा मित्रपक्षांना तर फायदा होईलच. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणं हाच आमचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे तयारी जोरात सुरु आहे, असं दानवेंनी सांगितलं.

सोलापूर मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर दानवे साताऱ्यात आले होते. त्यानंतर ते आता पुणे आणि शिरुर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले आहे.

दरम्यान, लातूरमध्ये भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाध्यक्ष अमित शाह म्हणाले होते, की ‘युती झाली तर ठिक नाही तर मित्रपक्षालाही धूळ चारु’. त्यामुळे भाजपने सर्व मतदारसंघांची जोरात तयारी सुरु केली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोबत आले तर तुमच्यासह, नाहीतर त्यांच्याशिवाय निवडणुकांना सामोरे जाऊ, असं म्हणत दानवे यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे.