रासपासाठी पाच जागा मागणार : जानकर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’कडे राष्ट्रीय समाज पक्ष पाच जागा मागणार आहे, असे पक्षाध्यक्ष व राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज नगरमधील पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जानकर हे आज नगर दौऱ्यावर आहेत. दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जानकर म्हणाले की, राज्य सरकारमध्ये मी काम केलेले आहे. आता दिल्लीत काम करण्यासाठी इच्छुक आहे. यासाठी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बारामतीसह माढा, अहमदनगर दक्षिण, परभणी, हिंगोली मतदारसंघातून मी निवडणूक लढवू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असणार असून राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यातील एक घटक पक्ष असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जानकर यांनी दौर्‍यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी बैठक घेऊन चर्चा केली. तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

बारामती आवडता मतदारसंघ
बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मी बारामतीतून निवडणूक लढवली होती. या वर्षीही येथून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, असे जानकर यांनी सांगितले.