शिकाऱ्याच्या  फासात अडकून बिबट्याचा मृत्यू

रत्नागिरी : पोलीसनामा आॅनलाईन – रत्नागिरीतमधून धक्कादाक प्रकार समोर आला आहे. शिकाऱ्याच्या फासात एक बिबट्या अडकला होता. तारेतून निसटता न आल्यामुळे भुकेने व्याकूळ होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. फासकीत अडकल्याने त्याला आपले प्राण गमवावे लागले आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या या तारेच्या फासकीत अडकला. शरीराभोवती बसलेला तारेचा पिळ त्याला सोडवता येत नव्हता. चिपळूण तालुक्यात कामथे सुकाई मंदिर परिसरात झाडाला बारीक तार बांधण्यात आली होती आणि तेथेच ही घटना घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार,आठ वर्षांचा पूर्ण वाढलेला हा नर बिबट्या होता.  त्याची लांबी 200 सेंटीमीटर तर उंची 70 सेंटीमीटर इतकी होती. बिबट्याचा मृत्यू भूकेने झाला असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. बिबट्या सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. त्यावेळी तारेचा पिळ त्याच्या शरीराभोवती घट्ट बसला होता असे दिसून आले इतकेच नाही तर तच तो भूकेने व्याकूळ झाला होता असे समजले.
गेल्या आठवड्यात अवनी वाघीणीला ठार केल्यानंतर प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर चंद्रपुरात कालच वाघाच्या तीन बछड्यांचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या जुनोना या जंगल परिसरातील ही घटना आहे. सदर बछडे अवनी वाघिणीचे बछडे असल्याचाही संशय व्यक्त केला गेला होता. इतकेच नाही तर अवनीच्या बछड्यांची ही शिकार वन विभागाने केली असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. याव्यतिरीक्त या बछड्यांच्या मृत्यूमुळे  राजकीय वर्तुळात वाद रंगण्याची शक्यताही वर्तवली गेली होती. बछड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या मागे घातपात असल्याचे मत प्राणी मित्रांकडून व्यत्त केले गेले.