टक्कल पडलाय ? नाराज होऊ नका ! असे पुरुष महिलांना अधिक आकर्षक वाटतात

वृत्तसंस्था-काही दिवसांपासून पुरुषांमध्ये बिअर्ड म्हणजे दाढी ठेवण्याची फॅशन दिसून येत आहेत. परंतु अनेक पुरुषांना डोक्यावरील केसांच्या अनेक समस्या असतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही करतात. कारण डोक्यावर टक्कल पडला तर आपल्याला कोणतीच मुलगी भाव देणार नाही असं त्यांना वाटतं. परंतु कोणाला कोण आवडेल हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर अवलंबून असते. म्हणजे एका व्यक्ती अमूक एखादी व्यक्ती आवडत असेल तर दुसऱ्याला ती आवडेलच असं काही नाही. परंतु तुम्ही जर टकले असाल तर तुम्हाला आता लाज वाटून घ्यायचं कारण नाही. कारण काही महिलांना टक्कल असलेले लोक पसंत असतात, असा एका शोधातून खुलासा झाला आहे. या शोधात असे सांगितले आहे की, अनेक महिलांना बाेल्ड म्हणजेच टक्कल असलेले पुरुष हॉट वाटतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसगळतीच्या समस्येने हैराण होण्याची काही एक आवशकता नाही.

अनेक पुरुषांना केवळ टाळूवरच केस नसतात आणि डोक्याच्या इतर भागावर केस असतात. तेच काही पुरुष असे असतात ज्यांच्या डोक्याच्या वेगवेगळ्या भागातील केस नाहीसे होतात. म्हणजेच टक्कल असण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. काही पुरुष आपलं टक्कल लपवण्यासाठी शिल्लक असलेल्या केसांनी केस नसलेली जागा झाकण्याचा प्रयत्न करतात. पण याने काहीही होत नाही. अशात पूर्णपणे टक्कल करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण कोणताही निर्णय घेण्याआधी याबाबत काही सत्य जाणून घ्या.

१) साधारण २५ टक्के पुरुष हे वयाच्या ३०व्या वर्षानंतर टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करतात. काही लोकांनी ही समस्या आनुवांशिकतेमुळे येते.

२) काही पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचं कारण आनुवांशिकता नाही तर वेगवेगळी कारणे असतात. त्यांना ही समस्या स्ट्रेस, पोषक तत्वांची कमतरता, डोक्याच्या त्वचेची समस्या यामुळेही होऊ शकते.

३) एका रिसर्चनुसार, १ हजार महिलांना तीन प्रकारचे पुरुष दाखवण्यात आले. पहिल्यात असे पुरुष होते ज्यांना डोक्यावर पूर्ण केस होते. दुसऱ्यात प्रकारातील पुरुषा हे थोडे टक्कल पडलेले होते तर तिसऱ्या प्रकारातील पुरुष हे पूर्णपणे टक्कल पडलेले होते. अशात १ हजार महिलांपैकी जास्तीत जास्त महिलांनी तिसऱ्या म्हणजे पूर्ण टक्कल असलेल्या पुरुषांना मत दिलं.

४) काही महिलांनुसार. पूर्णपणे टक्कल असलेले पुरुष हे इतरांच्या तुलनेत जास्त शक्तीशाली, मजबूत आणि उंच वाटतात. इतकेच नाही तर गर्दीच्या ठिकाणी ते सहज दुसऱ्यांना आकर्षित करतात.

५) काही महिलांनी आपलं मत मांडताना सांगितले की, त्यांना अर्धवट टक्कल अजिबात पसंत नाही. एकतर पुरुषांच्या डोक्यावर योग्यप्रकारे केस असावेत नाही तर पूर्णपणे टक्कल असावं. तसेच केसगळतीच्या समस्येने हैराण पुरुष हे शिल्लक राहिलेले केस कापून अधिक आकर्षक दिसू शकतात.

शोधातून समोर आलेल्या माहितीनुसार टक्कल असण्याचे फायदे जरी असले तरी तरी याचे काही तोटेही आहेत. कारण काही महिलांनी आपल्या उत्तरात असेही सांगितले आहे की, पूर्णपणे टक्कल असलेले पुरुष हे त्यांच्या वयापेक्षा चार वर्षांनी अधिक वयस्कर वाटतात. त्यामुळे टक्कल ठेवण्यापूर्वी या गोष्टीचाही विचार करायला हवा.