शैक्षणिक

पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातील शनिवारवाड्याला डॉ. पाटणकरांचाही विरोध

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विद्यापीठाचे नाव ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करूनही विद्यापीठाच्या बोधचिन्हात (लोगो) शनिवारवाड्याचे छायाचित्र कायम असून ते अजूनही बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे ते तत्काळ बदलण्यात यावे कारण शनिवारवाडा हा जातीयवादी, अत्याचार, स्रियांवरील अन्याय, अविद्याचे केंद्र होते. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातील शनिवारवाड्याचे छायाचित्र हटवून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचे छायाचित्र वापरावे,’ अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सातारा येथे पत्रकार परिषदेत केली.

डॉ. पाटणकर यांनी त्या अनुषंगाने साताऱ्यात डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्या रुग्णालयात आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, या अनुषंगाने लवकरच राज्यव्यापी लढा उभारणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘शनिवारवाडा हा शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत नसून त्याचा आणि शिक्षण क्षेत्राशीही काडीमात्र संबंध नाही. तेथे अस्पृश्­यतेचा इतिहास लिहिला गेला आहे. थोरले बाजीराव यांच्यानंतर जातीयता, धर्मांधतेच्या बाजूने हा वाडा राहिला. हा लोगो काढण्याबाबत पुण्यात सध्या सत्यशोधक ओबीसी संघटनेसह पंधरा संघटनांची चळवळ सुरू आहे. त्यासाठी आम्ही कार्यरतही झालो आहे.

पुणे येथील ब्राम्हण महासभेच्या अध्यक्षांनी पुणे विद्यापीठाच्या लोगोतून शनिवारवाडा काढला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला तर असा प्रश्न पडला आहे की, यात ब्राम्हण सभेचा काय प्रश्­न आहे. पेशवाई, शनिवारवाडा ब्राम्हणांचे प्रतीक आहे काय..?,’ असा आमचा सवाल आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या