ताज्या बातम्या

आता बाजारभावानुसार गृहकर्जाचे व्याजदर ठरणार : रिझर्व्ह बँक 

नवी दिली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने गृहकर्जासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एप्रिल २०१९ पासून गृहकर्जाचे व्याजदर बाजाराधिन करण्याचा निर्णय RBI ने घेतला आहे. येत्या चार महिन्यात हे बदल करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना दिली आहे. सध्या सिटी बँक वगळता कोणतीही बँक बाजारभावानुसार गृहकर्जाचे व्याजदर ठरवत नाही.

गेले अनेक वर्षं रिझर्व्ह बँक रेपो रेट आणि गृहकर्जाचे व्याजदर बाजारभावानुसार ठरवण्यावर चर्चा करत आहे.  बाजारभाव वाढले की बँकांचे व्याजदर वाढतात. पण बाजारभाव घटले की व्याजदर कमी होत नाही किंवा बँका बाजारभाव किंवा गृहव्यवहारासंबंधी कोणतचं मापक वापरात नाही.

काय होणार परिणाम

* बाजारभावांचा व्याजदरांसाठी निकष वापर केल्यास व्यवहारात पारदर्शकता येईल.

* बाजाराचा कानोसा घेऊन राष्ट्रीयकृत बँकांना ग्राहकांसाठी व्याजदरांची आखणी करता येईल.

दरम्यान , जनकराज समितीने काही वर्षांपूर्वी हे पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला होता. हे पाऊलं उचलण्यासाठी बँकांना त्यांच्या कर्जविषयक धोरणांमध्ये थोडे बदल करावे लागणार आहे. येत्या चार महिन्यात हे बदल करण्याची सूचना रिझर्व्ह  बँकेने इतर बँकांना दिली आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

3 + 12 =

Back to top button