ताज्या बातम्या

अमरावतीत ३ हजार वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृतिचा शोध

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – लोहयुगात मानवाने नदीकाठी वसाहती विकसित करण्यास प्रारंभ केला होता. पूर्णा नदीच्या काठावरील जमीन काळी, कसदार व सुपिक तर आहेच, शिवाय नदीला भरपूर पाणी असायचे. यामुळे नदीच्या काठावर त्या काळात मानवी वसाहत नांदली असल्याचे पुरावे अवशेषाच्या रूपाने अनेक गावात आढळून येतात. याच माध्यमातून चांदूरबाजार तालुक्यातील फुबगाव (सैदापूर) येथील पूर्णा नदीच्या काठावर तीन हजार वर्षांपूर्वीच्या लोहयुगातील मानवी संस्कृतीचा शोध घेण्याकरिता भारतीय पुरातत्व विभागाची चमू चांदूरबाजार तालुक्यात दाखल झाली  आहे.

तालुक्यातील फुबगाव येथील भीमराव पळसपगार यांच्या शेतात उत्खननाची तयारी चालविली आहे. पुढील तीन महिन्यांत पुरातत्व विभाग या संस्कृतीचे अवशेष शोधणार आहेत. भारतीय पुरातत्व विभागाचे नागपूर येथील संचालक डॉ.निहील दास एन यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कामाचे प्रभारी तहसीलदार नीलिमा मते यांच्या हस्ते या शोध मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. पुरातत्व विभागाच्या चमूने तालुक्यातील फुबगाव (सैदापूर) येथे दीपक किटुकले यांच्या शेतात उत्खनन सुरू केले आहे. यावेळी सरपंच संगीता किटुकले, मंडळ अधिकारी दाते, राजा ठाकरे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

छुओ ना मेरी हस्ती को, फूंक दूंगी तेरी बस्ती को : वादग्रस्त आयएएस (IAS) अधिकारी 

पुरातत्वचे पथक दाखलपुरातत्व विभागाच्या निवासासाठी भीमराव पळसपगार यांच्या शेतात तंबू उभारण्यात आले आहेत. या चमूत डॉ.प्रशांत सोनोने, डॉ.पी.पी.प्रधान, डॉ.एच.जे.बारापाये आदींचा समावेश असून स्थानिक मंजुरांनाही काम देण्यात आले आहे. गेल्यावर्षीदेखील पुरातत्व विभागाकडून फुबगाव येथे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी काही अवशेष आढळून आले होते. त्या अनुषंगाने फुबगाव येथे मानवी संस्कृतीचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाची चमू पुढील तीन महिने येथे डेरे दाखल राहणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी १९८२ ते ८४ दरम्यान पुरातत्व विभागाकडून डॉ. गोपर्डेकर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील तुळजापूर (गढी) येथे उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी लोहयुगातील संस्कृतीचे अवशेष सापडले होते. त्याचप्रमाणे बहादूरपूर येथेही लोहयुगाचे अवशेष सापडले होते.

मोदी, फडणवीसांच्या जुमलेबाजीला आता जनता कंटाळली : भुजबळ 

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या