‘रॉकी’ :  ACTION  FULL ON… ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : वृत्तसंस्था – मराठी अ‍ॅक्शनपट रॉकी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात,’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा  ट्रेलर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ‘अहमद खान’ यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.‘अ‍ॅक्शन, इमोशन, ड्रामा आणि रोमान्स यांनी परिपूर्ण असलेला या अ‍ॅक्शनपटात मुख्य भूमिकेत नवोदित अभिनेता संदीप साळवे हा दिसणार आहे.
रॉकीच्या माध्यमातून मी मुख्य भूमिकेत  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पदार्पणातच असा अ‍ॅक्शन चित्रपट मिळाल्यामुळे माझे पदार्पण दमदार होणार आहे. यापेक्षा दुसरी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही,’असं संदीपने सांगितलं.
तसेच ‘रॉकी’ हा  चित्रपट लोकांना नक्की आवडेल असा विश्वास हिंदीतले प्रसिद्ध नट ‘राहुल देव’ यांनी व्यक्त केला. ते सुध्या या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहे.
या चित्रपटातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे नवीन चेहरे  रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. याशिवाय  अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत,राहुल  देव हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहे.
‘बागी-२’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक ‘अदनान ए. शेख’ हे पहिल्यांदाच  ‘रॉकी’ चित्रपटाच्या  निमित्ताने  मराठी चित्रपटाचे  दिग्दर्शन करणार आहे.पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’ हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.