Ind v/s Aus Test :  दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार सामन्यांच्या मालिकेच्या दुसरा कसोटीचा सामना शुक्रवारी  खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. १३ सदस्यांच्या या संघामधून दुखापतीमुळे आर. अश्विन आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅडलेड कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठीचा भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला.बीसीसीआयनं ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. पर्थ मालिकेसाठी बीसीसीआयनं १३ जणांच्या संघाची घोषणाही केली आहे. यामध्ये विजयी संघातील रोहित आणि अश्विनचा समावेश नाही. रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, अश्विन आणि रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, चाहत्यांना ही खटकलेली दिसत आहे. सोशल मीडियावर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सामन्याआधी भारताला मोठा झटका
अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माची कंबर दुखावली असून अश्विनला ओटीपोटाच्या दुखण्याचा त्रास झाला आहे. तर अॅडलेड कसोटीआधीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीला दुखापत झाली होती. त्यामुळे दुखापतीमुळे या तिघांनाही भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे.

निवडलेला भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव