स्थायी समितीकडून शहर विकासासाठी ३९ कोटींचा निधी मंजूर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकत आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष ममता गायकवाड यांनी शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी ३९ कोटी रुपयांचा निधीला मंजूरी दिली.

यामध्ये प्रामुख्यानं मनपाच्या स्थापत्य विभागाकडील वडमुखवाडी फाटा ते चोविसवाडी येथे कृषीखात्याकडील ताब्यात आलेल्या जागेवर रस्ता रूंदीकरण व नाल्याचे बांधकामासाठी २० कोटी ५२ लाख तर पीएमपीएमएल ला सन २०१७-१८ मध्ये देय होणारी संचलनतूट समायोजीत करून उर्वरित संचलनतूट सुमारे १५ कोटी ८४ लाखाचे रूपयांचे समान हफ्त्यात अदा करण्याचं ठरवण्यात आले.

सांगवी किवळे रस्त्यावरील साई चौक ते पुनावळे चौक पर्यंतच्या रस्त्यावरील स्ट्रार्म वॉटर लाईन करिता १५ कोटी १४ लाख, मनपाच्या उद्यान विभागास ३ वर्ष कालावधीसाठी आवश्यक असणारी खेळणीसाठी ३ कोटी ८८ लाख, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्र टप्पा क्र.२ चे चालन देखभाल व दुरूस्तीसाठी २ कोटी २६ लाख, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्र टप्पा क्र.२ चे चालन देखभाल व दुरूस्तीसाठी २ कोटी २६ लाख, जुन्या हॅरिस ब्रिजची दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे २ कोटी ८५ लाख, भूमकर चौक ते मनपा हद्दीपर्यंतच्या रूंदीकरणा करिता २ कोटी ०४ लाख, इंद्रायणीनगर सेक्टर नं ३ येथील स्केटींग रिंग चे स्थापत्य, विद्युत व अनुषंगिक कामे करण्यासाठी १ कोटी ९३ लाख, रहाटणी येथे ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईन साठी १ कोटी २४ लाख, काळभोरनगर, मोहननगर येथील स्वच्छतागृहांचे नुतनीकरण करिता सुमारे ९७ लाख, वडाचा मळा परिसरातील ताब्यात आलेला डी.पी. रस्ते विकसाकरिता ७४ लाख, नाशिक फाटा ते वाकड या रस्स्तयावर गोविंद गार्डन चौक येथे सबवे बांधणे व विद्युत विषयक कामे करण्यासाठी ७४ लाख, आरोग्य विभागास आवश्यक साफ सफाई साहित्य खरेदीसाठी ६४ लाख, प्राधिकरणाचा उड्डणपुल ते टाटा मोटर्स कार प्लँन्ट रस्ता डांबरीकरण व चेंबर व्यवस्थासाठी ५५ लाख, मोरवाडी परिसरातील रस्त्यांचे मजबूतीकरण, सुधारणा, नुतनीकरण, काँक्रिटीकरणासाठी ४५ लाख रुपयांच्या इत्यादि खर्चासही या बैठकीत मंजूर करण्यात आले.