‘पु.ल.देशपांडे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व’ : सचिन तेंडुलकर

पुणे : पोलीसनामा आनलाईन-सामान्य माणसाशी त्यांना सहज जोडून घेता येई असं व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे असं वक्तव्य करत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. इतकंच नाही तर पु.ल. देशपांडे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व होते.

असंही सचिन म्हणाला. विशेष म्हणजे त्यांच्या घरी येऊन मी गहिवरलो असल्याचेही सचिनने म्हटले आहे. पुढे बोलताना सचिन म्हणाला की, “मी पुलंच्या जेवढ्या सीडीज पाहिल्या त्यातून हे जाणवले की पु.ल. देशपांडे सामान्य माणसाशी अगदी सहज जोडले जायचे. मी सर डॉन ब्रॅडमन यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद मला पुलंच्या घरी येऊन झाला.”  मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज पुलंच्या पुणे येथील भांडाकर रोडवर असलेल्या घराला भेट दिली. त्यानंतर त्याने आपल्या पु. लं च्या प्रति भावना व्यक्त केल्या.

पु. ल. देशपांडे यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात सचिनच्या हस्ते आय लव्ह पुलं (मी पुलं प्रेमी) या कार्यक्रमाच्या लोगोचे आणि पुलोत्सव पुणेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. सचिन तेंडुलकरने यावेळी पुलंच्या कुटुंबातील काही व्यक्तींशी संवाद साधला.

या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकरने जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी बोलताना सचिन म्हणाला की, “माझे बाबा आणि पु ल देशपांडे चांगले मित्र होते. त्यांची अनेक पत्रं बाबांनी मला दाखवली आहेत. माझे भाऊ आई वडील सतत पुलंविषयी बोलत असत. माझे बाबा आणि पुलं खूप चांगले मित्र होते. त्यांना मी १९९६ मध्ये भेटलो होतो. तेव्हा मी त्यांच्या सोबत फिश फ्राय खाल्ले होते. तेव्हा त्यांना फ्रेम दिली होती. ती फ्रेम आता पुन्हा परत पाहायला मिळाली.” यावेळी अनेक जुने क्षण सचिनच्या डोळ्यांसमोर तरळले.