सई चालली ऑफलाईन ; राहणार सोशल मीडियापासून दूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सई ताम्हणकर ही आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहेच. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. सईच काय पण सर्वांनाच सोशल मीडियाची सवय असते. एक दिवसही त्याविना राहिलो तर रोजच्या दिनचर्येत काही चुकल्यासारखे वाटत असते. हे अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यासाठी ते आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचण्याचे साधन असते. तर चाहतेही यावरुन आपल्या स्टारबद्दलची महिती जाणून घेत असतात. हे बंद झालेतर.

बोल्ड सईने आता एक बोल्ड निर्णय घेतला आहे. हा निर्णय एखाद्या कलाकारासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सई काही दिवस तिच्या सोशल मीडियापासून दूर राहणार आहे. एक महिना तरी सई आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिसणार नाही.

ट्‌विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर मी नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायलाही आवडतो. पण काही काळ मला स्वतःसाठी वेळ हवा आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मी हे करणार आहे, असं सईने म्हटलं आहे. त्यामुळे सई महिनाभर तरी आपल्या चाहत्यांपासून लांब असणार आहे.

दरम्यान, सईचे इन्स्टाग्रामवर ९ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत; तर ट्विटरवर ७९ हजारांपेक्षा जास्त लोक तिला फॉलो करतात. आता एक महिना तरी ती या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणार आहे. त्यामुळे एक महिन्यानंतर सई आपल्या चाहत्यांसाठी काय सरप्राईज आणणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.