सायना नेहवाल ने प्रेम गुलदस्त्यात ठेऊन केलं ‘या’ व्यक्तीशी लग्न..

दिल्ली ;  वृत्तसंस्था: सध्या सेलिब्रिटी आणि खेळाडूंच्या लगीन सराईची एकच लगबग चालू आहे खेळाडूंमध्ये आधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि आता महिला बॅडमिंटन पटू  सायना नेहवाल आणि पुरुष बॅडमिंटनपटू पी कश्यप यांचं लग्न आज पार पाडलं  हे दोघे ही बॅडमिंटन पटू हैद्राबाद चे राहणारे असून सायना दहा वर्षांपासून भारताचा बॅडमिंटन पटू पी कश्यप बरोबर रिलेशनशिप मध्ये होती पण यावर्षी त्यांनी या नात्याबद्दल खुलासा केला , आणि हे दोघे आज विवाह बंधनात अडकले ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना .त्याबरोबरच जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे त्याचप्रमाणे ऑलम्पिक बॅडमिंटन मध्ये कश्यप हा भारताचा पहिलाच पुरुष बॅडमिंटनपटु आहे.
सायना आणि कश्यप ही जोडी १६ डिसेंबरला लग्न करणार, असे वृत्त आले होते. पण सायनाने आम्ही १४ डिसेंबरला लग्न करत आहोत, असे ट्विटरवर जाहीर केले होते. सायना आणि पी.कश्यप यांच्या लग्नाला जवळच्या शंभर लोकांना या खास विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच लग्नानंतर पाच दिवसांनी म्हणजेच रिसेप्शन सोहळा होणार आहे.
सायना आणि पी.कश्यप यांचे १४ डिसेंबरला लग्न झाले. पण यापूर्वी त्यांच्या लग्नाची पत्रिकाही वायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. सायना आणि पी. कश्यप हे जवळपास दहा वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नव्हता. काही दिवसांपूर्वी सायनाने पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता.