…म्हणून ‘आर्ची’ ने घटवले तब्बल १२ किलो वजन 

मुंबई : वृत्तसंस्था – सैराट चित्रपटातून लोकांसमोर आलेली आणि लोकांच्या मनावर राज्य करणारी रिंकु राजगुरू सैराटनंतर मात्र पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येताना काही दिसली नाही. तिचे चाहते तिला पु्न्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असताना दिसत आहे. परंतु आता ती एका चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याचंही समजत आहे. विशेष म्हणजे तिने वजन घटवल्याचे समोर आले आहे.
‘सैराट’ रिलीज होऊन बराच काळ लोटला आहे. तरीही तिची प्रेक्षकांवरील जादू आजही कायम असताना दिसत आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वेळोवेळी चाहत्यांच्या भेटीला येत असते.  रिंकूने आपल्‍या इन्‍स्‍टाग्रामवर काही फोटोज अपलोड केले आहेत. हे फोटो पाहून तुम्‍हीही आवाक व्‍हाल. कारण, ‘रिंकू’ या चित्रपटात स्‍लिम दिसत आहे. तिला पाहण्यासाठी चाहते नेहमीच प्रतिक्षेत असतात. अशातच तिने आता आपले सुंदर फोटो इन्‍स्‍टाग्रामला शेअर केले आहेत.
या चित्रपटातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येणार 
‘सैराट’ नंतर तब्बल दोन वर्षांनी आर्ची पाहायला मिळणार आहे. मकरंद माने दिग्दर्शित ‘कागर’ चित्रपटातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातल्या तिच्या एका गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रिंकू डान्स करत असताना दिसली होती. या गाण्यात तिने स्वत:मध्ये मोठा बदल केल्याचे दिसून आले. तिने आपले वजन कमी केल्याचे निदर्शनास आले.  ‘कागर’ च्या गाण्यातील व्हिडिओत ती स्लिम दिसत आहे. ‘कागर’ मध्ये मुख्य भूमिकेत कुठला अभिनेता असेल, हे अद्याप समजलेले नाही.
म्हणून रिंकुने घटवले १२ किलो वजन
समोर आलेल्या माहितीनुसार, रिंकुने दोन महिन्यांत १२ किलो वजन कमी केले. आता रिंकू खूपच फिट आणि स्‍लिम दिसत आहे. यासाठी तिने विशेष मेहनत घेतली आहे. रिंकूने व्‍यायाम करून वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने योग्य व्यायाम आणि डाएटिंगही सुरू केलं.  मुख्य म्हणजे  तिची आईच तिची डाएटीशियन होती. तिच्या डाएटींग दरम्यान  तिने गोड पदार्थ टाळले आणि सलाडवर लक्ष दिले. तिच्या या मेहनतीचे तिला विशेष फळही भेटले.