सलमानला पुन्हा तारीख पे तारीख …

जोधपूर :वृत्तसंस्था
काळवीट शिकार प्रकरणातील आरोपी अभिनेता सलमान खान याने १९९८मध्ये केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेचा निकाल खूप उशिरा ५ एप्रिल२०१८ रोजी लागला. त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या घटनेची पुढची सुनावणी १७ जुलैला होईल असा निर्णय आज जोधपूर येथील न्यायालयाने दिला. सलमानला आता पुन्हा ‘तारीख पे तारीख’ मिळाली आहे. या प्रकरणी सलमान न्यायालयाच्या सुनावणीसाठी आदल्या दिवशी रात्री त्याची बहीण अलवीरा खान, मित्र बाबा सिद्दकी आणि वकिलांसह जोधपूर मध्ये आला होता. सलमानची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपी अभिनेता सैफ आली खान अभिनेत्री नीलम आणि तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले.