अनैतिक संबंधांच्या संशयावरून ‘सेल्समन’चा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ‘सेल्समन’चा खून झाला असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना आंबेगाव, खेड येथून शनिवारी सायंकाळी अटक केली आहे.
नंदू वसंत चव्हाण (४२, रा. सांगवी) याचा खून झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53a444a2-c9e8-11e8-90fb-4f00625dcbb3′]

अविनाश पाटीराज डेमेंटी (रा. नवी सांगवी) आणि दीपक गवळी (रा. काटे पुरम चौक, सांगवी) या दोघांना अटक केली आहे. सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार नंदू हा सेल्समनचे काम करत होता. शुक्रवारी दुपारी तो जेवण करून बाहेर गेला होता. अंजठानगरमध्ये जाणाऱ्या आतल्या रस्त्यावरील टपरीवर तो सिगारेट ओढण्यासाठी गेला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. नागिरकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

विश्रांतवाडी आणि निगडी मध्ये २ युवकांचा खून

रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर मारेकरी फरार झाले होते. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करत होते. दरम्यान मिळलेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन खुन केल्याची कबुली या दोघांनी दिली. ताब्यात घेतलेल्या दोघाना निगडी पोलिसांकडे देण्यात आले आहे. तपास निगडी पोलीस करत आहेत.

[amazon_link asins=’B011XO54NY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’681396e4-c9e8-11e8-ab58-23239810fc01′]

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम तांगडे, सुधाकर काटे, सहायक निरीक्षक दिपाली मरळे, प्रमोद वेताळ, अमित गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली.