‘भारत’ च्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’ ला मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो आहे. आधी या चित्रपटातून प्रियांका चोप्रा ने वॉक आउट केले. त्यानंतर पाकिस्तानी झेंडा फडकवल्यावरून या चित्रपटाबद्दल वाद सुरु झाला, आणि आता या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान जखमी झाल्याचे वृत्त आहे. सलमान ला उपचाराकरिता मुंबई यथील खाजगी रुग्नालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सलमानच्या हाडाला हेअरलाईन फ्रैक्चर झाले आहे. जिम मध्ये व्यायाम करताना सलमानला इजा झाली. डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. भारत चित्रपटाचे शूटिंग पंजाब मधील लुधियानापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बल्लोवाल गावात सुरु होते. चित्रपटाची पूर्ण स्टार  कास्ट कैटरीना कैफ, सुनील ग्रोवर, जैकी श्रॉफ देखेल चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी यथे आले आहेत. सलमान जखमी असल्या करणाने सध्या तो चित्रीकरण करीत नाहीय पण बाकी कलाकारांचे चित्रीकरण सुरु आहे. पण सलमान लवकरच तंदुरुस्त होऊन चित्रीकरणाला हजर होईल.

सलमानचा ‘भारत’ सिनेमातील लूकची क्रेझ
सलमानच्या भारत चित्रपटाची खूपच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. याशिवाय सिनेमात मोठ-मोठे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगचे तीन शेड्युल आत्तापर्यंत पूर्ण झाले असून नुकताच भारतच्या टिमने अबुधाबीमध्ये तिसरं शेड्युल पूर्ण केलं आहे. चित्रपटाच्या चौथ्या शेड्युलचं शूट सुरू असताना सलमानच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आत्तापर्यंत या चित्रपटातील भूमिकांचे फोटोज व्हायरल होताना दिसत होते. मात्र आता सलमानचा शूटिंग दरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात सलमान चेक्स शर्टमध्ये आपल्या फॅन्ससोबत दिसला आहे. सलमानच्या हेअर स्टाईलकडे पाहिलं तर याआधी बजरंगी भाईजान या सिनेमात त्याची अशी हेअर स्टाईल दिसून आली होती. आणि आता भारत चित्रपटात तो अशाच लूकमध्ये दिसणार आहे.

भाईजान सलमान या चित्रपटात पाच वेगवेगळ्या वयोगटातील भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात २०वर्षापासून ते ६० वर्षापर्यंतच्या भूमिकेत सलमान दिसेल. भारत हा चित्रपट कोरियन सिनेमा हिंदी रिमेक आहे. ‘ऑड टू माय फादर’ असं त्या चित्रपटाचं नाव आहे.

सिनेमाच्या कास्टिंगबद्दल याआधीसुद्धा माहिती देण्यात आली होती. अभिनेता जॅकी श्रॉफच्या भूमिकेचं नाव महाभारत असं आहे. सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ करताना दिसेल. भारतची पहिली बायको स्मृतीचा रोल अभिनेत्री तब्बू साकारणार आहे. चित्रपटातील महत्त्वाची बाब म्हणजे सलमान खान या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतची मुलगी राधाची भूमिका अभिनेत्री दिशा पाटनी करणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा रोमांस या सिनेमात पहायला मिळणार आहे.