‘सलमानचे ऐकले नाही याचा आता पश्‍चाताप होत आहे’

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री कॅटरीना कैफ हिने सलमान खानचं न ऐकल्याने पश्चाताप होत असल्याचा खुलासा केला आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. कॅटरीनाने गेल्याच वर्षी आमिर खानचा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ आणि शाहरूख खानचा ‘झिरो’ हे दोन चित्रपट केले. परंतु हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरल्याचे दिसून आले. आणि चित्रपट केल्याचा तिला आता पश्चाताप होत असल्याचं समजत आहे. झिरो आल्‍यानंतर केवळ शाहरुखच्‍या प्रेमापोटी चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली हेही ती चांगल्या प्रकारे जाणते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानने कॅटला हे दोन्ही चित्रपट न करण्‍याचा सल्‍ला दिला होता. परंतु तिने मात्र सलमानचे काही एक ऐकले नाही. असेही समजत आहे की, सलमानने  ‘झिरो’ आणि ‘ठग्ज’ या चित्रपटांची स्क्रीप्ट वाचली होती. त्यानंतर सलमानने हा चित्रपट न करण्याचा सल्ला कॅटला दिला होता. इतकेच नाही तर, हे चित्रपट कॅटच्या फायद्याचे नाहीत असेही सलमानने सांगितले होते असेही समजत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, झिरो या चित्रपटासाठी पहिल्यांदा सलमान खानला ऑफर देण्यात आली होती. परंतु, सलमानने हा चित्रपट नाकारल्याने शाहरूख खानला ऑफर देण्‍यात आली. आता लवकरच सलमान आणि कॅट भारत या आगामी चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.