‘या’ ठिकाणी आणि अशा ‘अंदाजात’ होणार सलमानची बर्थ डे पार्टी  !

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड चा भाईजान म्हणजेच  सलमान खान हा  २७ डिसेंबरला आपला ५३ वा वाढदिवस साजरा करणार आहे.  सलमानचा वाढदिवस म्हणल्यावर जोरदार पार्टी तर होणारच सलमान त्याचा बर्थ डे त्याच्या परिवारासोबत दरवर्षीप्रमाणे यंदांही पनवेलस्थित आपल्या फार्म हाऊसवर साजरा करणार आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार या बर्थडे साठी  संपूर्ण खान कुटुंब आणि  काही मित्रमंडळी फॉर्म हाऊसवर मुक्काम करणार आहे. यावेळी नुसता सलमानचा वाढदिवसचं नाही तर ख्रिसमस आणि न्यू इअर चे सेलिब्रेशन सुद्धा  होणार आहे. २४ डिसेंबरलाच सलमान आपल्या कुटुंबासोबत फार्महाऊसवर पोहोचणार आहे. त्यामुळे २४ ते २७ असे चार दिवस सेलिब्रेशन होईल. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतील.

काही दिवसापूर्वी ‘भारत ‘चित्रपटाच्या शूटिंगला स्थागिती देत दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी  सोशल मीडियावरून या विषयी माहिती दिली होती. भाईजान के बर्थ डे के महिने में कौन काम करता है भाई…असे त्याने म्हटले होते. या चित्रपटासाठी सलमानने खूप मेहनत घेतली आहे. सलमान सोबत या चित्रपटात तब्बू ,जॅकी श्रॉफ ,दिशा पाटणी दिसणार आहे.