मनोरंजन

१० कोटींचा ‘भारत’चा सेट होणार उद्ध्वस्त

वृत्तसंस्था : अभिनेता सलमान खानचा आगामी ‘भारत’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. येत्या पुढील काही दिवसांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटसाठी मुंबईतील फिल्मसिटीत दहा कोटींचा सेट उभारण्यात आला आहे. पण चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी हा सेट पुर्णपणे उदध्वत करण्यात येणार आहे.

‘भारत’ हा चित्रपट ‘ओडे टू माय फादर’ या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात सलमान खान, अभिनेत्री कतरिना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये करण्यात आले आहे. या सिनेमात पहिल्यांदाच सलमान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासुन मुंबईतील फिेल्मसिटीतमध्ये या सिनेमाचे शिटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणास दिरंगाई होऊ नये म्हणून सलमाननेही आपले बस्तान काही महिन्यांपासून फिल्मसिटी परिसरात हलवले आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button