मनोरंजन

ही अभिनेत्री ‘सून’ म्हणून सलमानच्या आईला आहे पसंत

मुंबई : वृत्तसंस्था – सलमान खान हा बॉलिवूड चा मोस्ट हँडसम बॅचलर म्हणून ओळखला जातो तो जिथे जातो त्याचे चाहते आणि अनेक जण त्याला लग्न कधी करणार ? असे विचारतात. या प्रश्नाकडे तो सतत दुर्लक्ष करताना दिसतो. किंवा काही मजेशीर उत्तर देतो. तर सलमानच्या आईला कोण अभिनेत्री सून म्हणून पसंत आहे याचा खुलासा नुकताच झाला आहे.
५२ वर्षाच्या सलमानचा काही लग्नाचा विचार दिसत नाही. पण सलमानच्या आईला एक अभिनेत्री सून म्हणून नक्की आवडेल आता ही अभिनेत्री कोण हे जाणून घ्यायला तुम्हालाही नक्की आवडेल ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून कतरीना कैफ आहे.
सलमान खानची आई आणि कतरिना कैफ या एकमेकींच्या खूप जवळ आहेत. दोघी अनेकदा एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. भारत सिनेमाच्या शुटिंगवेळी कतरिना कैफ आणि सलमानच्या आईचे अनेक फोटो समोर आले होते. यावेळी दोघी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढले.
सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. त्याचं अफेअर ऐश्वर्या राय, यूलिया वंतूर, कतरिना कैफ सारख्या अभिनेत्रींसोबत होत. पण सलमानने कधीच या नात्यांविषयी खुलासा केला नाही. सलमान खान च्या आगामी ‘भारत’ चित्रपटमध्ये कतरिना कैफच अभिनेत्री म्हणून आहे. तसेच तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पाटणी हे कलाकार सुद्धा चित्रपटात दिसणार आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या