सॅमसंगचा (Samsung) नवीन ‘वाॅटरप्रूफ टॅब’ भारतात लाॅंच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सॅमसंगने भारतात गॅलेक्सी टॅब ऍक्टिव्ह-२ बाजारात आणला आहे. या टॅबमध्ये अनेक नवीन फिचर अॅड करण्यात आले आहेत. या टॅबलेटला मोठी बॅटरी, वॉटर प्रूफ व डस्टप्रूफ, एसपेनच्या सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे.

या टॅबलेटचे खास वैशिष्टे म्हणजे यात ८ इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. त्यात टचचा सपोर्ट असून रिझॉल्यूशन १२८०X८०० आहे. यात ७. १.१ ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच ३ जीबी रॅमसह १६ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. मेमरी कार्डच्या साहायाने याला वाढवता येवू शकते. ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कीबोर्ड कनेक्ट करण्यासाठी पोगो पिन, वायफाय, ब्लूटूथ, एनएफसी ४ जी एलटीई आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंगचा पोर्ट दिला आहे.

‘हा’ हल्ला आम्ही कधीच विसरणारही नाही आणि त्यांना सोडणारही नाही 

या टॅबलेटमध्ये ४४५० एमएमएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा टॅब शॉक आणि ड्रॉप प्रूफ आहे. हा टॅब ३० तासापर्यंत पाण्यात ठेवल्यानंतरही याला काहीही होत नाही. या टॅबची किंमत ५० हजार ९९० रुपये इतकी असून याची विक्री मार्च २०१९ पासून होणार आहे. सॅमसंगने नुकतेच भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम २० आणि एम १० या मोबाइलचा यात समावेश आहे. या दोन्ही फोनची विक्री सध्या ऑनलाइन स्टोरमधून फ्लॅश सेलमध्ये सुरू आहे.