जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लॉन्च, किंमत स्मार्ट फोनपेक्षा कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तमाम टीव्ही प्रेमींसाठी खुशखबर आहे. कारण जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट एलईडी टीव्ही भारतात लॉन्च करण्यात आला आहे. सॅमी इनफॉर्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेटड (Samy Informatics Pvt. LTD) ने हा टीव्ही सादर केला आहे. या टीव्हीला Samy Android TV असे नाव देण्यात आले आहे. ज्या किंमतीत आजकाल स्मार्टफोन सुद्धा मिळणार नाही अशा किंमतीत ३२ इंची तोही पूर्णपणे स्मार्ट एलईडी टीव्ही विकला जाणार आहे. कंपनीने या स्मार्ट टीव्हीची किंमत फक्त ४९९९ रुपये ठेवली आहे. कंपनीचा दावा आहे, की कुठल्याही महागड्या स्मार्ट टीव्हीमध्ये असलेले सर्वच फीचर्स यात दिले जात आहेत. त्यामध्ये Screen Mirror आणि WiFi सह अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

सोबत तीन वर्षांची वॉरंटी
जगातील सर्वात स्वस्त टीव्ही आणि तोही फक्त ५ हजारांच्या आत हे ऐकूण अनेकांना आपल्या कान आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. त्यातही लोकांना स्वस्तात इतका चांगला आणि स्मार्ट टीव्ही मिळणार म्हणजे, नक्कीच तो लवकर खराब होईल अशी भीती वाटेल. परंतु, कंपनीने या गोष्टीची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली आहे. ३ वर्षांत कधीही हा टीव्ही बिघडल्यास कंपनी तो मोफत दुरुस्त करून देणार आहे. अर्थातच त्यावर ३ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. या टीव्हीला एकदा इंटरनेट किंवा मोबाईल इंटरनेटशी जोडल्यास अगदी स्मार्टफोनप्रमाणे कुठलेही अ‍ॅप वापरता येईल. मग, तो युट्यूब असो वा एखादे स्मार्टफोन टीव्ही अ‍ॅप… गुगलच्या प्ले स्टोरवरून आपल्याला कुठलेही अ‍ॅप इंस्टॉल सुद्धा करता येणार आहे. विशेष म्हणजे, या या टीव्हीचे पार्ट भारतातच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया मोहिमेत बनवण्यात आले आहेत. हा टीव्ही खरेदी करत असताना आधारकार्ड आवश्यक आहे.

असे आहेत फीचर्स

— LED टीव्हीत सॅमसंग आणि LG कंपनीचे पॅनल देण्यात आले आहे
— हे Android ४.४ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार आहे
— टीव्हीमध्ये १० वॉटचे स्पीकर्स
— ४GB रॅम आणि ५१२MB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे
— सोबतच एचडी साउंडसाठी SRS डॉल्बी डिजिटल आणि ५ बॅन्ड इक्वलायजर सेटिंग्स सुद्धा आहेत
— टीव्हीसोबत कंपनी ऑन साइट वॉरंटी आणि ऑनसाइट सर्व्हिस सुद्धा देत आहे
— टीव्हीमध्ये २ HDMI पोर्ट आणि २ USB पोर्ट मिळतील
— गेम सुद्धा खेळले जाऊ शकतात