सांगलीतील वाळवा तालुक्यात ७ मुलींचे लैंगिक शोषण

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरपळ येथे एका संस्थाचालकाने ७ मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2472269b-c182-11e8-a69f-e51959569dcc’]

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरपळ येथील मिनाई शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या सात मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. शिक्षण संस्था चालकानेच हा धक्कादायक प्रकार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच संस्था चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिसांनी धाव घेतली असून चौकशी सुरु असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटना वारंवार घडत आहेत. परंतु या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना उघडकीस आल्याने शाळेमध्ये देखील मुली सुरक्षीत नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण संस्थेतच अशा घटना घडल्याने सर्वसामान्य जनतेतून आणि पालकांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

[amazon_link asins=’B07B4S1GLV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4f773936-c183-11e8-9d0e-9b0206d01a6b’]

मुंढव्यात भरदिवसा सराफ व्यापाऱ्यावर खुनी हल्ला

काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये एका मदरशामध्ये मुलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच सांगली जिल्ह्यामध्ये अशाप्रकारची घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची रोडरोमीयोंकडून छेड काढण्यात येते. त्यामुळे शाळा कॉलेज, महाविद्यालयात मुली सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

[amazon_link asins=’B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4cde7a93-c185-11e8-a48e-d9214f2022dd’]

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील घडलेल्या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ  उडाली आहे. संस्था चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. तर पीडित मुलींकडे देखील चौकशी सुरु असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पीडित मुलींच्या लैगिक शोषणाच्या या प्रकारामुळे पीडित मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण संस्था चालक आणि पीडित मुलींच्या चौकशी नंतरच खरा प्रकार समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’720c06fe-c182-11e8-881e-4752d17b6dd3′]

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या दिल्‍लीच्या निर्भया अत्याचार प्रकरणानंतर सरकारने बलात्कारासंबंधीचा कायदा अधिक कडक केला. अशा प्रकरणांची सुनावणी दोन महिन्यांत पूर्ण करण्याची तरतूद केली, हे खरे; परंतु वस्तुस्थिती वेगळी आणि गंभीर आहे. कायदा कडक करूनसुद्धा अशा प्रकारच्या घटना कमी झालेल्या नाहीत. याचा अर्थ, विकृत मानसिकतेच्या पुरुषांना नव्या कायद्याचाही धाक राहिलेला नाही.

ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या चिमुकलीचे महिला शिक्षिकेने केले लैंगिक शोषण
मुंबई – कांदिवलीतील एका शाळेत ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ वर्षाच्या चिमुकलीने घरी पालकांनी खोदून खोदून शिताफीने विचारल्यानंतर शाळेत महिला शिक्षिका शरीराच्या काही भागाला स्पर्श करते असे पालकांना सांगितले. त्यानंतर संबंधित पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना हा प्रकार सांगितला. नंतर पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.