संजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेब रोज पाठवायचे ‘हा’ मेसेज 

मुंबई वृत्तसंस्था- नुकतीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या ‘ठाकरे’ सिनेमातीला दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.  बाळासाहेबांची ९३ वी जयंतीही जवळ आली आहे. याच निमित्ताने बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मानाचा मुजरा’ हा विशेष कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमाच्या टीझरचे व्हिडीओ फेसबुकवर  व्हायरल होताना दिसत आहेत. या टीझरमध्ये अभिनेता संजय दत्त याने बाळासाहेबांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माझी आई बाळासाहेबांना भाऊ मानायची असंही संजूबाबाने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तसेच मी तुरुंगामध्ये असताना बाळासाहेब रोज मला एक मेसेज पाठवायचे असंही संजय दत्तने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. २५ जानेवारी रोजी ठाकरे हा  सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबईमध्ये १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. यानंतर अवैधरित्या शास्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली संजय दत्तला अटक करण्यात आली होती. यावेळी संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी थेट बाळासाहेबांकडे मदत मागितली होती. आणि बाळासाहेबांनी मदत केल्याने संजय दत्त तुरुंगाबाहेर पडला होता.  या मलुखातीमध्ये बाळासाहेबांबद्दल संजय भरभरून बोलला आहे. बाळासाहेबांचे संजय दत्तवरील प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. संजय दत्तची ही मुलाखत अवधुत गुप्तेनी घेतली आहे. यात बाळासाहेबांसोबत  दत्त कुटुबियांचे  कौंटुंबिक संबंध कशा प्रकारचे होते हे संजयने सांगितले आहे.

बाळासाहेब ठाकरे हे नाव आयुष्यामध्ये पहिल्यांदा कधी ऐकले?

या प्रश्नाला उत्तर देताना संजय दत्त म्हणाला की, “पहिल्यांदा मी बाळासाहेबांचे नाव माझ्या आईकडून ऐकले. आई नेहमी म्हणायची की बाळासाहेब मला भावासारखे आहेत आणि त्यांच्याविषयी मला खूप आदर आहे. अमेरिकेत कर्करोगावरील उपचारासाठी जाण्याआधी आईने आम्हा तिघांना बोलावून सांगितलं होतं, ‘आयुष्यात काहीही लागलं तरी माझा एक भाऊ आहे, बाळासाहेब ठाकरे. तुम्ही त्यांच्याकडे नक्की जा.’ असं संजय दत्त म्हणाला.

जेव्हा तुम्ही बाळासाहेबांना पहिल्यांदा भेटलात तेव्हाच्या काही आठवणी सांगाल का?

याबाबत बोलताना संजय दत्त म्हणाला की, “मी तुरुंगातून सुटल्यानंतर सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलो. त्यानंतर थेट साहेबांना भेटायला गेलो. साहेब वाघ आहेत वाघ. त्यांनी मला खूप प्रेम दिलं. जेवढा वेळ मी आर्थर रोड कारागृहात होतो तेव्हा रोज त्यांचा मला मेसेज यायचा. ‘संज्या को बोल फिकर नही करने का मैं हूँ इधर,’ अशा शब्दांत ते मला आधार द्यायचे. ते राजकारणी होते पण त्याहून अधिक ते देशभक्त होते. एखाद्यावर प्रेम असल्यास ते मुक्तपणे व्यक्त करायचे, मग तो व्यक्ती चांगला असो किंवा वाईट. पण त्याच वेळी त्यांना राग आला तर तुम्ही संपलातच.”