संस्कृती बालगुडेला करायचाय इंदीरा गांधींवर बायोपिक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (सुरज शेंडगे) – इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व म्हणजे माझ्यासाठी आजही प्रेरणादाई वाटते.  इंदिरा गांधींनी त्यांच्या आयुष्यात  केलेला संघर्ष मला नेहमीच एक कलाकृती साकार करण्यासाठी खुणावत असतो. म्हणून मला भविष्यात इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवायला आवडेल असे संस्कृती बालगुडे म्हणाली  आहे. पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात संस्कृती बोलत होती.

इंदिरा गांधींचा संघर्ष मला खुणावतो 

इंदिरा गांधी यांनी आपल्या आयुष्यात आपल्या मुलाचा अपघात स्वतःच्या डोळ्याने बघितला तरी सुद्धा त्या खचल्या नाहीत. तरी हि त्यांनी खंबीर पणे उभा राहून देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या आयुष्यात अनेक राजकीय प्रसंग आले त्यांना त्यांनी एक महिला म्हणून खूप चांगल्या पद्धतीने तोंड दिले. त्यांच्यातील धाडसी महिला मला त्यांच्या आयुष्यावरील बायोपिक बनवायला खुणावत असते असे संस्कृती बालगुडे म्हणाली आहेत.

माझ्या बाबांनी मला इंदिराजींची सांगितलेली एक गोष्ट मला आज हि आठवते. ती म्हणजे इंदिरा गांधी यांचे निधन झाले तेव्हा निम्म्या भारतीय लोकांनी मुंडन केले होते. यातूनच इंदिराजींची लोकप्रियता दिसून येते म्हणून अशा आयर्न लेडी बद्दल एक बायोपिक करायला नक्की आवडेल असे संस्कृती म्हणाली आहे. नाट्यचित्र कला अकादमी पुणे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्कृती बोलत होती.

सोनाली कुलकर्णीची लोकप्रियता  बघून भेटली सिनेशृष्टीत जाण्याची प्रेरणा 

सोनाली कुलकर्णी यांना मी नृत्य शिकवले आहे आणि त्यांच्या एका चित्रीकरणात मी त्यांच्या मागे नृत्य हि केले आहे असे संस्कृती म्हणाली आहे. तर याच चित्रीकरणा दरम्यान सोनाली कुलकर्णी यांच्या फॅनचा गराडा सोनाली त्यांच्या भोवती पडला. तेव्हा सोनाली कुलकर्णी आपल्या फॅन्सला ऑटोग्राफ देऊ लागल्या आणि संस्कृतीच्या मनात हि आले कि आपण हि एवढी मोठी अभिनेत्री व्हायला पाहिजे आणि लोकांनी आपली हि ऑटोग्राफ घ्यायला असे मोठ्या संख्येने आपल्या कडे आले  पाहिजे.  अशी प्रेरणा या प्रसंगातून घेऊन संस्कृती मोठी अभिनेत्री झाली.  याची हकीकत तिने आज  सांगितली आहे. या कार्यक्रमा प्रसंगी आ. विनायक मेटे , अभिनेते सुनील गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.