भाजप सरकारला पुन्हा निवडून देऊ नका : युवक काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन – शेतकरीविरोधी धोरणामुळे भाजपा – शिवसेना सरकारच्या चार वर्षांच्या काळात राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार सर्वच बाबतीत असंवेदनशील असून सर्व आघाड्यावर पिछाडीवर आहे, येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला जनता जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही. जनतेच्या हितासाठी राहुल गांधी यांचे हात बळकट करा व अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

उमरी तालुक्यातील तुराटी येथील शेतकऱ्याने ऐन दिवाळीत सरण रचून आत्महत्या केली. या घटनेबाबत तीव्र भावना राज्यभर व्यक्त केल्या जात आहेत. याची दखल घेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भोकर फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. सरकारचे सरण रचून प्रतिकात्मक आंदोलन या वेळी करण्यात आले.

इसापूर धरणाचे पाणी इतरत्र वळविण्याचा प्रयत्न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर यांनी दिला. प्रदेश सरचिटणीस करण ससाणे, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, भोकर विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख, अब्दुल गफ्फार, सत्यजित भोसले, संदीप सोनकांबळे, रुपेश यादव, माधव कदम, दत्तू देशमुख, अमोल डोंगरे, संतोष मुळे, अतुल वाघ, बालाजी शिंदे, जनार्दन बिरादार, संदीप शिंदे, युवराज वाघमारे, सुहास शिंदे, भगवान तिडके, शंकर शिंदे, सतीश बस्वदे, ज्ञानेश्वर राजेगोरे, अजिंक्य पवार, विजय सोंडारे,केशव मुंगल, स्वप्नील टेकाळे, डॉ. विशाल लंगडे, अंबादास रातोळे, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.
अंत पाहू नका, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा

नांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी सर्कलमधील शेतकऱ्यांनी कहाळा येथे नांदेड – हैदराबाद राज्य महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांचा अंत न पाहता दुष्काळ जाहीर करुन दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना जाहीर करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनाला बरबडा तसेच कहाळा (बुद्रुक व खुर्द), सोमठाणा, हिप्परगा, पाटोदा, कृष्णूर, सावरखेड, आंतरगाव, मनूरसह अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आणेवारी वाढवून देऊन या भागाला दुष्काळग्रस्त यादीतून वगळून अन्याय केल्याची आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला. या भागात दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. नायब तहसीलदार वगवाड यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारुन भ्रमणध्वनीवरून तहसीलदारांना संपर्क केला असता १५ डिसेंबरपर्यंत फेर आणेवारी काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मटक्याच्या जुगाराने अनेकांना केले उध्वस्त ; पोलीस कारवाईची गरज