राजकीय

मोदींच्या अडचणी वाढण्याची शक्यता ; गोध्राप्रकरणी जुलैमध्ये पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोध्रा हत्याकांड प्रकरणात विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. यानंतर याच्याविरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जुलैपासून आव्हान याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

झाकिया जाफरी या 2002 साली झालेल्या गोध्रा हत्याकांडातील मृत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी आहेत. विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा जाे निकाल दिला होता त्याविरोधात झाकिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 5 ऑक्टोबर 2017 रोजी झाकिया यांनी दाखल केलेली एसआयटीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली होती. यानंत त्यानी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे आव्हान याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, न्यायालयाने सुनावणीपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केलेल्या अर्जाची माहिती घेणार असल्याचे म्हटले आहे. सेटलवाड या प्रकरणातील झाकिया जाफरी यांच्या सहयाचिकाकर्त्या आहेत. गोध्रा प्रकरणात विशेष तपास पथकाने जाे अहवाल सादर केला होता त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 63 जणांना क्लिन चिट दिली होती. यामध्ये काही वरीष्ठ अधिकारीही होते. या सर्वांविरोधात कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे या अहवालात म्हटले होते. विशेष तपास पथकाने 8 ऑक्टोबर 2012 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 63 जणांना क्लिन चिट दिली होती.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या