स्कुल व्हॅनमध्ये लावलेल्या घरगुती सिलेंडरचा स्फोट, १२ मुले गंभीर 

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश येथील भादोई येथे शनिवारी सकाळी एका स्कूल व्हॅनमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना घडली. या घटनेत 12 मुले जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही व्हॅन मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना त्यातील सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने गाडीला आग लागली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
भदोही जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावरच ही दुर्घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरल्याने ही दुर्घटना घडली असून या गाडीमध्ये शाळेत जाणारी 12 मुले होते. त्यांना शाळेत सोडण्यासाठी गाडी निघाली असता वाटेतच सिलेंडरचा स्फोट झाला आणि गाडीला आग लागली. त्यात 12 मुले जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असणाऱ्या मुलांना तात्काळ वाराणसी येथे हलविण्यात आले.
घटना घडताच ड्राइवर फरार…. 
माध्यमामांनी दिलेल्या माहितीनुसार,स्फोटामुळे लागलेल्या आगीनंतर व्हॅन मधील मुले जोरजोरात आरडा-ओरड करू लागली मात्र आग लागताच चालकाने व्हॅनचा दरवाजा लॉक करून तेथून पळ काढला.घटनास्थळी उपस्थित असलेल्या सीता शुक्ला यांनी व्हॅनमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु गाडी लॉक असल्याकारणाने त्यांना काहीही करता आले नाही.काहीवेळात तेथे इतरही लोक जमा झाले. त्यांनी व्हॅनचा दरवाजा तोडला सर्व मुलांना बाहेर काढले तोपर्यंत उशीर झाला असल्याने अनेक मुले भाजली गेली.