पाकिस्तानच्या शाळेत भारतीय गाण्यासोबत तिरंगा फडकावल्याने झाले असे काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या एका शाळेतील कार्यक्रमाच्या सादरीकरणात भारताचे गाणे वाजवून तिरंगा फडकावल्याने शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कराची येथील ममा बेबी केअर कँब्रिज स्कूलची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

पाकीस्तान मधील कराची येथील बेबी केअर कँब्रिज स्कूलमध्ये लहान मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, त्या कार्यक्रमावेळी लहान विद्यार्थ्यांनी भारतीय गाण्यावर नृत्य सादर केले. इतकेच नव्हे तर, मागच्या बाजूला भारतीय ध्वजही फडकावला. दारम्यान त्यावेळी काढण्यात आलेला व्हिडियो पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावेळी स्थानिकांनी या शाळेची तक्रार केल्याने डायरेक्टोरेट ऑफ इन्स्पेक्शन एँड रजिस्ट्रेशन ऑफ प्रायव्हेट इंस्टिट्यूट्स ने शाळेवर कारवाई करत मान्यता रद्द केली. शाळेतील कार्यक्रम पाकिस्तानच्या विरोधातले आहे. त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली, असे डायरेक्टोरेट ऑफ इन्स्पेक्शन एँड रजिस्ट्रेशन ऑफ प्रायव्हेट इंस्टिट्यूट्सच्या रजिस्ट्रार राफिया जावेद यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वी काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद स्वीकारली होती. त्यानंतर भारतात बदल्याची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवाद्यांना याची किंमत चुकवावी लागणार, असा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर, बदल्याची वेळ, ठिकण हे सैनिकच ठरवतील त्यांना पूर्ण स्वत्रंत्र देण्यात आले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन देशातील संबंध अजुन बिघडण्याची शक्यता आहे.