राजकीय

VIDEO व्हायरल : राष्ट्रीय कृषी परिषद की डान्सबार !

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप सरकारवर विरोधकांकडून नेहमीच टीका होत असतात. शिवाय विरोधक त्यांच्यावर टीका करण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. त्यात भाजपचे नेतेही अनेकदा विरोधकांच्या हातात आयत कोलीत देतात. पुन्हा एकदा भाजपच्या एका आमदाराने विरोधकांना टीका करण्याची संधी दिली आहे.

कृषी विभाग आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वरूडमध्ये राष्ट्रीय कृषी विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. ही परिषद दि. ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान झाली. या कार्यक्रमा दरम्यानचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये कृषी परिषदेच्या मंचावर चक्क नाचगाण्याचा कार्यक्रम झाल्याचे दिसत आहे. त्यावर एक मुलगी नाचत असून काही लोक तिच्या बाजूला नाचत आहेत. तर खालील व्यक्ती त्यावर पैसे उधळत आहेत. असा हा व्हीडिओ राष्ट्रवादीने आपल्या ट्वीटरवरून शेअर केला आहे.

भाजपाच्या आमदाराने शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली भरवलेल्या कृषिविकास परिषदेत चक्क नाच-गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. कृषी परिषदेच्या नावाखाली भाजपाने अश्लील नाचांचा कार्यक्रम केला, असा आरोप राष्ट्रवादीने ट्वीटवर केला आहे.

दरम्यान, आमदार अनिल बोंडे यांनी या कार्यक्रमाचा भार संभाळला होता. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमात असे चित्र पाहायला मिळाल्याने आता अनिड बोंडे वादात अडकण्याची शक्यता आहे.

 

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button