बसचे चाक पायावरून गेल्याने गोटेवाडीच्या वृद्धाचा मृत्यू

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईन-येथील बसस्थानकावर बुधवारी दुपारी वसंत कृष्णा गायकवाड (रा. गोटेवाडी, ता. तासगाव) यांच्या पायावरून कवठेमहांकाळ आगाराची बस गेली. यावेळी गायकवाड यांना जखमी अवस्थेत मिरज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र जादा रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई कवठे महांकाळ ही (एम एच 12,सिपी 7603) ही कवठे महांकाळ आगाराची बस होती. फलाटावर वृद्ध गाडीच्या आडवा आल्याने अपघात झाल्याची नोंद तासगाव पोलिसात झाली आहे. तर तासगाव शहरातील दूसरी घटना आहे. मागील आठवड्यात गणपती मंदिर जवळ माया चव्हाण यांना एसटी ने चिरडले त्यात माया चव्हाण यांचा मृत्यु झाला होता.

वृद्धाश्रमे कमी करायला पोरांवर  संस्कार करा. मा.आ.शरद पाटील

कुमठे शाळेच्या पोरांनी दिली वृद्धाश्रमास भेट, खाऊचे पैसे दिले आज्जी ,आजोबांना

तासगाव-एकत्र कुटुंब पद्धती संपली आणि म्हाताऱ्या आई बापाला सांभाळणं पोरांना नको वाटायला लागलं. घरान आभाळाची उंची गाठली आणि माणुसकीने पाताळाची खोली गाठली, मात्र त्या घरात आई बापाला राहायला जागा नाही. म्हणून वृद्धाश्रमे कमी करायची असतील तर तरुणांवर चांगले संस्कार करा असे मत माजी आमदार शरद पाटील यांनी व्यक्त केले. सांगली येथील वृद्धसेवाश्रम ला तासगाव तालुक्यातील कुमठे येथील मुलांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी मुलांनी खाऊचे साठवलेले साडेतीन हजार रुपये आजी आजोबांसाठी दिले.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की म्हाताऱ्या लोकांबद्दल आमची आपुलकी आता संपली. घरात ते नको वाटतात. सध्या समाजात तरुण पोरांना रोजगार व वृद्धांना आधार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वृद्धाश्रम काढून हा प्रश्न सुटणार नाही यासाठी पोरांवर योग्य संस्काराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आता भविष्यात गावोगावी गोशाळा न्हवे तर म्हाताऱ्या माणसांसाठी वृद्धाश्रम काढावी लागतील असे पाटील म्हणाले.कुमठे येथील लोकनेते दिनकर आबा पाटील शाळेच्या दहावीच्या 50 पोरांनी सांगली येथील वृद्धसेवाश्रमला भेट दिली व खाऊचे साठवलेले साडेतीन हजार रुपये शाळेस दिले.

यासाठी संस्थेचे अध्यक्ष अविनाश काका पाटील यांचे सहकार्य मिळाले. मुख़्याध्यापक पी.ब़ी शिंदे , एरंडोले व्हि बी , शेंडगे डी व्हि हे उपस्थित होते . शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक पी.डी.पाटील यांनी केले.

आजी आजोबांच्या वेदनांनी पोर रडली..

ज्या वयात बसून खायचं, नातवासोबत खेळायचं त्या वयात पोरान व सुनेंन घराबाहेर काढलं, मुलगी सांभाळत न्हाय , पोर मोठ्या हुद्यावर हायती पण उपयोगाचं न्हाय. आजी आजोबा आपल्या भावना डोळ्यात पाणी आणून आपल्या नातवाप्रमान असलेल्या पोरांना सांगितल्या. आणि दहावीची पोर गलबलून जात मुसमुसुन रडली.