शिक्षणमंत्री राजीनामा द्या; सर्वधर्मिय नागरिकांची मागणी 

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाईन – महापुरूषांची बदनामी करणारा मजकूर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकातून काढून टाकावा, संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याची नैतिक जबाबदारी स्विकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बार्शीतील सर्व धर्मीय नागरिकांनी तहसिलदारांना निवेदनाव्दारे केली आहे. राज्यात आणि देशात अनेक गंभीर प्रकार सातत्याने घडत असल्याने पाठ्यपुस्तकातील वादग्रस्त मजकुराचे प्रकरण काहीसे मागे पडले होते. परंतु, बार्शीतील सर्वधर्मिय नागरिकांनी पुन्हा या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात या नागरिकांनी म्हटले आहे की, राज्य शासनाच्या वतीने शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने जी पाठ्यपुस्तके छापली आहेत त्यात महापुरूष, प्रेषीत, इतिहास पुरूषांची बदनामी करणारे लेख प्रसिध्द केले आहेत. ही सर्व पुस्तके चुकीचा इतिहास पसरवत आहेत. याचा परिणाम पुढच्या पिढीवर होणार आहे. इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याच्या प्रयत्न या लेखातून झाला आहे. त्यामुळे महापुरूषांचा, प्रेषीतांचा अवमान झाल्याची भावना नागरीकांत निर्माण झाली आहे. याला कारणीभूत असलेल्या संबंधीत व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच बदनामीकरणारे पुस्तके परत घेत ती पुस्तके रद्द करावीत.

या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी याची नैतिक जबाबदारी म्हणून राज्याचे शिक्षणमंत्र्यांनी राजानीमा द्यावा. नागरिकांनी दिेलेले हे निवेदन तहसिलदार ऋषिकेत शेळके यांनी स्विकारले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अजित कांबळे, इमाम लांडगे, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, शहेजादे शेख, शुभम चव्हाण, शाहीद शेख, मोहसीन तांबोळी, खाजा लांडगे, मोहसीन रमदान, फिरोज मोमीन, रिजवान मुकेरी, अक्रम बाबुडे व सर्वधर्मीय नागरीक उपस्थित होते.

जाहिरात