लग्नघरातून सात लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दरवाजा उघडा असल्याचा डाव साधून लग्नघरातून सात लाखांची रोकड भरदिवसा चोरून नेल्याचा प्रकार कात्रज येथे शुक्रवारी दुपारी घडला. या प्रकरणी भारती विद्याापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश गोरख फाटे (वय २४,रा. हेमी प्लाझा, किनारा हॉटेलजवळ, कात्रज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हे कात्रज भागातील संतोषनगर परिसरातील सागर अपार्टमेंटमध्ये राहण्यास आहेत. सागरचा विवाह ठरला आहे. लग्नाची खरेदी करावयाची असल्याने त्यांनी बँकेतून रोकड काढली होती. फ्लॅटमध्ये त्यांनी कपाटात सात लाखांची रोकड ठेवली होती. मात्र शुक्रवारी दुपारी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने कपाटातील सात लाखांची रोकड लांबविली.

हा प्रकार सागर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. कुणीतरी माहिती असलेल्यानेच रोक़ड चोरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड तपास करत आहेत.