औंधमधील जस्मीन स्पामधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – औंध परिसरातील आयटीआय रोडवरील अक्षय कॉम्पलेक्समध्ये असलेल्या जस्मीन स्पा वर पार्लरवर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभाग व चतुश्रृंगी पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून तीन तरुणींची सुटका केली आहे.

ललपिंग लोल हमार (३०, रा. जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर पिटा अक्टनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील आयटीआय रोडवरील अक्षय प्लाजा येथील जस्मीन स्पामध्ये स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर याबाबत पोलिसांकडून खात्री करण्यात आली. त्यावेळी ललपिंग हमार ही मुलींकडून स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास सामाजिक सुरक्षा विभाग व चतुश्रृंगी पोलिसांच्या संयुक्त पथकाने जस्मीन स्पावर छापा टाकून तीन तरुणींची सुटका केली. तर ललपिंग हमार हिला अटक केली. तिच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे व कर्मचारी तसेच चतुश्रृंगी पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.