कोरेगांव पार्कयेथील प्युअर आर्मनी स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील उच्चभ्रु परिसरम्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगांव पार्कमधील प्युअर आर्मनी स्पा सेंटरमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ मुलींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.९) दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06ae0967-cc7c-11e8-9096-6d379da39153′]

कांगझान पेयुल (वय-२४ रा. मुंढवा चौक, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शेडगे (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उप निरीक्षक अश्विनी हुले यांनी फिर्याद दिली आहे.

कोरेगांव पार्क येथील लिबर्टी सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील प्युअर आर्मनी स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोरेगांव पार्क पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करुन घेतली. डमी ग्राहकाने वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे सांगितल्यनंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून ३ मुलींची सुटका केली करुन कांगझान पेयुल याला अटक केली. पैशांचे अमिष दाखवून पेयुल हा मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. पुढील तपास कोरेगांव पार्क पोलीस करीत आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d963947-cc7c-11e8-9cc8-951bc641fc25′]

कुंटनखान्यातून परराज्यातील मुलींची सुटका
पुणे : बुधवार पेठेतील एका धार्मिक स्थळाजवळील बिल्डींगमध्ये सुरु असलेल्या कुंटनखान्यावर छापा टाकून ३ परराज्यातील मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर आंध्रप्रदेशमधील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई फरासखाना पोलिसांनी मंगळवारी (दि.९) रात्री साडेआठच्या सुमारास केली. ममता राम नायक असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ममता नायक ही बुधवार पेठेत धार्मिक स्थळाजवळील बिल्डींगमधील कुंटनखाना चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पश्चिम बंगाल येथील २ तर मुंबई येथील १ मुलीची सुटका केली. पुढील तपास फरासखाना पोलीस करित आहेत.