व्हॉटसअ‍ॅप वर शरिर सुखाची मागणी करणाऱ्या मंदिरातील पुजाऱ्याविरूद्ध गुन्हा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरत येथील स्वामी नारायण मंदिरातील पुजारी दिव्य प्रकाश स्वामी यांनी महिलेला व्हॉटसअ‍ॅपवरुन अश्लिल मेसेज पाठवून शरिर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोंडाई पोलीस ठाण्यात स्वामी नारायण यांच्यासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या 

याबाबत सविस्तर महिती अशी, की सुरत येथील स्वामी नारायण मंदिरातील पुजारी दिव्य प्रकाश स्वामी व त्यांचे पाच सहकारी महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवर, फेसबूक वर अश्लिल मेसेज पाठवून शरिर सुखाची मागणी करत आहे. पिडीत महिला व्यवसायाने शिक्षक आहे. महिलेला मागिल आठ दहा दिवसांपासून सतत अश्लिल मेसेज पाठवून छळण्यात येत आहे. स्वामी आपल्याला व आपल्या परिवाराला काहीतरी बरेवाईट करतील या भितीने व मेसेजच्या त्रासाला कंटाळून महिलेने दोंडाइचा पोलीस ठाण्यात पुजारी व त्यांच्या पाच सहकाऱ्यांविरूद्ध तक्रार दिली आहे.

दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर दिव्य प्रकाश स्वामी व त्यांचे सहकारी फरार झाले आहेत. या प्रकरणी अधिक तपास दोंडाईचा पोलीस करत आहेत.