ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी रुग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होता. यावेळी त्या तपासणीसाठी गेल्या होत्या यावेळी चाचणी केल्यानंतर शबाना यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हॉस्पिटलाईज झाल्यामुळे मला विसाव्यासाठी वेळ मिळत आहे असे सांगत त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “मला शांत बसून आत्मचिंतनासाठी फार कमी वेळ मिळतो. मात्र आता जबरदस्ती विश्रांती घ्यावी लागत आहे. मी कुठल्याही डुकराच्या संपर्कात नाही आले. मी रुग्णालयात असून वेगाने रिकव्हरी होत आहे” असंही शबाना आझमींनी सांगितलं.

शबाना आझमी यांनी 1974 साली श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय अमर अकबर अँथनी, किस्सा कुर्सी का, परवरिश, स्वामी, स्पर्श, थोडीसी बेवफाई अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत. शबाना आझमी या प्रसिद्ध गीतकार कैफी आझमी यांच्या कन्या, तर गीतकार जावेद अख्तर यांच्या पत्नी आहेत. नुकत्याच त्या ‘नीरजा’ चित्रपटात झळकल्या होत्या. विशेष म्हणजे अर्थ, खंदार आणि पार या सिनेमांसाठी त्यांना 1983 ते 1985 मध्ये सलग तीन वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. शबाना आझमी यांनी राजकारणातही एन्ट्री घेतली होती. 1997 साली त्या राज्यसभेवर निवडून आल्या होत्या.