सचिनचा धोनीला सल्ला ; वाचा काय म्हणाला सचिन ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाविरुदधच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. बऱ्याच काळानंतर धोनीची फलंदाजी त्याच्या चाहत्यांना अनुभवता आली. या सामन्यात धोनीने फिनिशरचे काम केले. धोनीच्या या खेळीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचं कौतुक केलं आहे. त्यासोबत धोनीला एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.

धोनीने एखाद्या शोच्या अँकरप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली भूमिका बजावावी, असं सचिनने म्हटलं आहे. धोनी एक असा खेळाडू आहे, जो आधी काही चेंडू वाया जाऊ देतो. खेळपट्टी जाणून घेतो, गोलंदाजी समजून घेतो. त्यानंतर तो सामना शेवटपर्यंत घेऊन जाणं पसंत करतो. एका बाजूने खेळावर कंट्रोल ठेवण्याचं काम धोनी करतो, असं सचिनने म्हटलं आहे.

धोनीसोबत शेवटपर्यंत त्याची साथ निभावणारा दिनेश कार्तिकचेही सचिनने कौतुक केले आहे. धोनीसोबतच दिनेश कार्तिकनेही चांगली फलंदाजी केली. तो आला आणि सामना संपेपर्यंत मैदानावर उभा राहिला. हे दिनेशचं योगदान उत्तम होतं, असं सचिनने म्हटलं आहे.

दरम्यान, धोनीने अनेकदा संघाला संकटातून बाहेर काढले आहे. मात्र मागली काही काळापासून त्याचा फॉर्म दिसत नव्हता. त्यामुळे त्यावरुन त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. मात्र कालच्या समान्यात हे पुन्हा सिद्ध झाले आहे की धोनीचे मैदानावर असनेच मोठी गोष्ट आहे. शिवय धोनीला या सामन्यात आपला सुर गवसला आहे. या सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात सिक्सर ठोकून धोनीने भारताला ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी विजय मिळवून दिला होता.