मनोरंजन

आजपर्यंत का नाही पाहिला शाहरुखने त्याचा पहिला चित्रपट ?

मुंबई : वृत्तसंस्था – जगात अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये ज्याची गणना होते आणि ज्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात अशा बॉलिवूडच्या किंग खानने म्हणजेच शाहरुख खानने अद्याप स्वतःचा पहिला चित्रपट पाहिला नाही. शाहरुखने त्याचा पहिला चित्रपट ‘दीवाना’ कधीच पाहिला नाही. होय, नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने याचा खुलासा केला आहे.

१९९२ मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुखचा पहिला चित्रपट ‘दिवाना’ होता. या चित्रपटात ऋषी कपूरसोबत शाहरुख खानची प्रमुख भूमिका होती या चित्रपटात अभिनेत्री म्हणून दिव्या भारती झळकली होती.

या चित्रपटाला २६ वर्षं झाले अजूनही शाहरुखने हा चित्रपट पाहिलेला नाही. याबद्दल नुकताच त्याला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत शाहरुखने सांगितले, मी तेच चित्रपट पाहतो ज्याच्या चित्रीकरणामध्ये मला मजा येते. मन ओतून त्या चित्रपटात काम करता आलं नाही. यामुळेच मी ‘दीवाना’ हा चित्रपट कधीच पाहिला नाही.

शाहरुखचा ‘झिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला या चित्रपटाला आलेल्या अपयशामुळे अभिनयावर लक्ष केंद्रीत केलं आहे. वृत्तानुसार शाहरुख लवकरच ‘डॉन३’ चित्रपटात दिसून येणार आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या