माढ्यातून लोकसभा लढणे हि शरद पवारांची पूर्वनियोजित खेळी

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवारांच्या मनाचा थांग कोणालाच लागत नाही. त्यांचे राजकीय डाव सर्वांनाच धक्का देऊन जातात. माढा मतदारसंघात शरद पवार उभा राहणार हे अचानक स्पष्ट झालेली बाब नाही. तर त्यांनी चार वर्षांपूर्वी यासंदर्भात आढावा घेतला होता. त्यावेळी कुणाला स्वप्नात हि वाटले नसेल कि शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढणार नाही घोषणा बदलतील. शरद पवार यांच्या मुसद्दी खेळीतून हि बाब स्पष्ट झाली आहे कि माढ्यातून लोकसभा लढण्याचे त्यांच्या खूप दिवसापासून मनात होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांसद आदर्श ग्राम अभियान सुरु केले. त्यावेळी शरद पवार यांनी माढा मतदारसंघातील एनकूळ हे गाव या योजनेसाठी निवडणले. त्यांच्या माढ्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचे मनसुबे उघड होऊ नये म्हणून त्यांनी माढा मतदारसंघातील मात्र सातारा जिल्ह्यातील गाव या योजनेसाठी निवडले. हि शरद पवार यांची सूक्ष खेळी कोणाच्याही लक्षात आली नव्हती

प्रभाकर देशमुख यांच्या निवृत्तीच्या वेळी, तुम्हाला काही जबाबदारी द्यायची आहे असे शरद पवार देशमुखांना म्हणाले होते. प्रभाकर देशमुख यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा छेडणे हा देखील शरद पवार यांच्या उमेदवारीच्या खेळीचाच भाग होता हे आत्ता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. तसेच पक्षात गटबाजी उफाळली आहे म्हणून मी उमेदवारी करत आहे हि शरद पवार यांची जुनीच राजकीय खेळी आहे. आता प्रभाकर देशमुख यांना पवारांच्या रणनीतीचे भागीदार झाले म्हणून राज्यसभा अथवा विधानपरिषद आगामी काळात मिळाली तर कुणी नवल नमानावे. एकंदरच शरद पवार यांच्या मनात काय चालू आहे याची जरासुद्धा कुणकुण कोणाला लागू शकत नाही हेच यातून सिद्ध होते.