लोकसभेची रणधुमाळी : युतीला ४५ नव्हे ४८ जागा मिळतील : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेना भाजप युती झाली असून आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकू असा संकल्प भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. याच संदर्भात आज शरद पवार यांनी युतीच्या या संकल्पाची खिल्ली उडवली आहे. सेनाभाजप युती राज्यात ४५ नव्हे ४८ जागा जिंकेल असा उपरोधक टोला शरद पवार यांनी युतीच्या ऐक्यावर लगावला आहे. ते पत्रकारांशी पुण्यात बोलत होते.

भाजप आणि शिवसेनेला सत्तेची उब सोडवत नाही म्हणून ते पुन्हा एकत्र आले आहेत असा चिमटा देखील शरद पवार यांनी शिवसेने भाजप युतीला काढला आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊन सेना-भाजप युतीची घोषणा केली आहे. शिवसेना २३ तर भाजपा २५ जागी लोकसभेची निवडणूक लढेल असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

शिवसेना भाजप युतीचा फायदा विरोधकांना होईल असे विरोधकांना वाटते आहे. कारण शिवसेनेने पाच वर्ष भाजपला विरोध करण्याचे काम केले म्हणून शिवसेनेच्या नेत्यांना जनता निवडून देणार नाही. या बाबत अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उघड प्रतिक्रिया माध्यमात दिली आहे.